२५ वर्षीय प्रथमेश पाटील जर्मनीमध्ये एमएस करत होता. त्याचवेळी त्याच्या मेंदूमध्ये कॅन्सरची गाठ असल्याचं निदान झालं. मात्र तीन वर्षांच्या ट्रीटमेंट नंतर त्याचा मृत्यू झाला. नियमानुसार कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू करण्याआधी प्रथमेशचे शुक्राणू जर्मनीमध्ये जतन करून ठेवण्यात आले होते. त्यामुळे टेस्ट ट्यूब बेबीद्वारे प्रथमेशच्या अपत्याला जन्म देता येईल का असा विचार प्रथमेशची आई जयश्री पाटील यांच्या मनात आला. त्यानुसार त्यांनी सह्याद्री हॉस्पिटल मधील डॉक्टर्स ची संपर्क साधला.प्रथमेशचं लग्न झालेलं नसल्यानं बाळाच्या जन्मासाठी एग डोनर आणि सरोगेट मदर शोधणं हे आव्हानात्मक होत. मात्र, जयश्री पाटील यांच्या नात्यातील एका महिलेनं सरोगसीसाठी होकार दिल्या नंतर तिच्या गर्भात हे बाळ वाढविण्यात आलं आणि नुकतंच या महिलेनं जुळ्यांना जन्म दिला. ज्यामुळे प्रथमेश परत आल्याची भावना त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलीये.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews